बातम्या
विवेकानंद मध्ये “ पर्यावरणपूरक दसरा ” साजरा
By nisha patil - 10/13/2024 6:05:05 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज मध्ये पर्यावरणपूरक दसरा साजरा करण्यात आला.. 'दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा' उक्ती सर्वसामान्या मध्ये प्रचलित आहे. या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या सोनेरी दिवसाला आपट्याचे पान वाटप करण्याची रुढीपरंपरा आहे. मात्र या रूढी परंपरे कडे नव्या दृष्टीने नव्या विचाराने बघणे ही पर्यावरणाच्या दृष्टीने काळाची गरज आहे. आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आजही पाळली जाते मात्र शहर परिसरातील आपट्यांची मोठे वृक्ष दुर्मिळ होत चालले आहेत दसऱ्या दिवशी आपट्याच्या कुळातील कांचन वृक्षाच्या फांद्या तोडून त्या दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात परिणामी कांचन वृक्षावरही संकट येऊ लागले असून पर्यावरणाचा ऱ्हासाला हातभार लागत आहे. या पारंपारिक सणाची कास धरून पर्यावरण पूरक दसरा साजरा करण्यात आला आहे.
वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पाना ऐवजी रद्दी पेपर, जुन्या लग्नपत्रिका,
जुनी भेट कार्ड व नैसर्गिक रंगाचा वापर करून आपट्याच्या पानाच्या आकाराची पर्यावरण पूरक पाने तयार केली असून त्यावर पर्यावरण पूरक संदेश लिहिले आहेत. पानाचे वैशिष्ट्य म्हणजे पान वापरताना त्यामध्ये वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ही पाने कुठेही पडली तरी त्यामध्ये नवीन झाडे तयार होतील.
या पारंपारिक सणाची कास धरून पर्यावरण पूरक दसरा साजरा करण्यात करून जनजागृती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. शिर्के यांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख बी. टी. दांगट यांनी केले व सूत्रसंचालन श्रावणी शिरसाठ हिने केले. या कार्यक्रमास मा. प्राचार्य डॉ. आर आर कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद मध्ये “ पर्यावरणपूरक दसरा ” साजरा
|