बातम्या
संदिप कणेरकर यांना "सेनामेडल वीरता पुरस्कार"
By nisha patil - 1/21/2025 5:47:34 PM
Share This News:
संदिप कणेरकर यांना "सेनामेडल वीरता पुरस्कार"
वारणानगर (ता. पन्हाळा): भारतीय लष्करातील जवान संदिप कृष्णात कणेरकर यांना "सेनामेडल वीरता पुरस्कार" प्राप्त झाला. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी जम्मू-काश्मीर सरहद्दीवर अतिरेक्यांच्या हल्ल्यात संदिप कणेरकर यांनी शौर्य दाखवून एका खतरनाक अतिरेक्याला ठार केले.
त्यांचे निडर धाडस, युद्धनिती कौशल्य आणि शूरता पाहून त्यांना पुणे येथील भारतीय सेना दिवस कार्यक्रमात सेनामेडल वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे गावातून त्यांचे कौतुक होत आहे.
आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते संदिप कणेरकर यांचा सत्कार करण्यात आला.
संदिप कणेरकर यांना "सेनामेडल वीरता पुरस्कार"
|