राजकीय
"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्या आणि उपायांची चर्चा!
By nisha patil - 11/14/2024 5:44:30 PM
Share This News:
"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्या आणि उपायांची चर्चा!
इचलकरंजी येथील नागू मळा, गावभाग परिसरात आमदार मा. श्री. प्रकाशआण्णा आवाडे यांनी 'चाय पे चर्चा' या उपक्रमाद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली. नागरिकांशी संवाद साधताना, त्यांच्यापासून शिकण्याची आणि समाजाच्या गरजा व अपेक्षांची अधिक स्पष्ट समज मिळवण्याची संधी प्राप्त झाली, ज्यामुळे पुढील कार्यांसाठी नवी ऊर्जा मिळाली.
आजपर्यंत केलेल्या कामांचे नागरिकांचे मत व प्रतिक्रिया घेतल्यावर, त्यांच्या सूचनांमुळे पुढील कार्यांना दिशा मिळाल्याचे सांगितले. नागरिकांच्या विश्वासाने आम्हाला नवी प्रेरणा मिळते, आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, संजय जगताप, जनता बँक इचलकरंजीचे संचालक योगेश पाटील, नंदू पाटील, गजानन लोंढे, मलगोंडा पाटील, रामगोंडा पाटील, पिरगोंडा पाटील, भाऊसाहेब पाटील, बाळगोंडा पाटील व पाटील कुटुंबियांसह नागू मळा, गावभाग परिसरातील प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक व बूथ प्रमुख उपस्थित होते.
"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्या आणि उपायांची चर्चा!
|