बातम्या

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी, आकर्षक बक्षिसांची घोषणा!

Chandrakant chashak


By nisha patil - 3/31/2025 10:09:16 PM
Share This News:



कोल्हापूरमध्ये बुधवारी (२ एप्रिल २०२५) पासून "चंद्रकांत चषक - २०२५" फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, तर उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक दिले जातील. उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे आणि गौरव चिन्हे दिली जातील.

स्पर्धेचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा कालावधी २ एप्रिल ते १३ एप्रिल असेल.


चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी, आकर्षक बक्षिसांची घोषणा!
Total Views: 57