बातम्या
भक्तीमय वातावरणात संतवाणीचा गजर
By nisha patil - 2/27/2025 8:08:00 PM
Share This News:
भक्तीमय वातावरणात संतवाणीचा गजर
पिंपळेश्वर महादेव मंदिरात सप्ताहाची भक्तिमय सुरुवात.. संतवाणीचा गजर
महाशिवरात्री निमित्त पिंपळेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी..अध्यात्मिक वातावरण निर्माण
गोदावरी काठावर वसलेल्या अतिशय प्राचीन पिंपळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या द्वादशी निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सप्ताहाची सुरुवात ह.भ.प. श्रीनाथ महाराज गोसावी यांच्या गोड कीर्तनाने झाली.संत एकनाथ महाराज यांच्या १४ व्या वंशज असलेल्या श्रीनाथ महाराजांनी "काल खाऊ दहिभात" आणि "वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे" या अभंगावर आधारित प्रवचनातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले.
सप्ताहाच्या प्रारंभी ह.भ.प. अनुसयाताई महाराज, सोमित्रा महाराज कर्डीले, पांडुरंग शिंदे, विनोद सोनवणे, नारायण साळुंखे, विशाल पोहेकर, अशोक पोपळघट, प्रल्हाद महालकर, भास्कर वाढवाने, अशोक दमाल, बाबासाहेब भावले, विलास मोरे आणि अशोक बेडल यांसारख्या अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.यावेळी पिंपळेश्वर महादेव मंदिरात भक्तिरसात न्हालेल्या किर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. सप्ताहभर अध्यात्मिक प्रवचने, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भक्तीमय वातावरणात संतवाणीचा गजर
|