शैक्षणिक
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस चालना देणारा Chemsophy-2025
By nisha patil - 2/22/2025 6:13:28 PM
Share This News:
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस चालना देणारा Chemsophy-2025
कोल्हापूर दि. 22 : विवेकानंद महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी. व रसायनशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने Chemsophy-2025 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस व वैज्ञानिक दृष्टिकोनास वाव देणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते झाला. या अंतर्गत रसायनशास्त्र विषयासंबंधी केममॅजिक स्पर्धा, केमलिडर-वक्तृत्व स्पर्धा, केममास्टर -पोस्टर प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ. एस. डी. शिर्के, आय.क्यू.ए.सी. विभाग प्रमुख डॉ. श्रृती जोशी, एम.एस्सी. समन्वयक डॉ. ए. एस.कुंभार, प्रबंधक श्री. आर. बी. जोग यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी रसायनशास्त्र विभागातील उपक्रमाचे समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस चालना देणारा Chemsophy-2025
|