बातम्या

छगन भुजबळ यांनी घेतली शरद पवारांची भेट

Chhagan Bhujbal met Sharad Pawar


By nisha patil - 7/15/2024 7:11:48 PM
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी काल  जोरदार टीका केली होती.त्यानंतर छगन भुजबळ हे आज शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
    
           चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार आणि छगन भुजबळ भेटत आहे. महाराष्ट्रात सामाजिक घडामोडी होत आहे. त्याला अनुसरून ही भेट असू शकते. आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतः भेट का होती हे स्पष्ट करतील, असे त्यांनी म्हटले आहे.


छगन भुजबळ यांनी घेतली शरद पवारांची भेट