बातम्या
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील घोटाळ्यांचा पर्दाफाश:
By nisha patil - 1/20/2025 3:28:44 PM
Share This News:
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील घोटाळ्यांचा पर्दाफाश:
शिवसेना संजय पवारांची प्रशासनावर टीका
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अनेक घोटाळे उघडकीस आले असून, सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे संजय पवार यांनी केला आहे. प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचे उघड करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले.
छत्रपती प्रमिला राजा रुग्णालयात अनेक घोटाळे उघडकीस आले असून सरकारवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर आज उद्या बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पवार यांनी या प्रकरणावर ताशेरे ओढत तातडीने सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टेबल मशीन आणि गर्भपातासाठीच्या औषधांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
संजय पवारांनी हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या aमोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे. २५ कोटींचा खर्च अपेक्षित असताना ५२ कोटींचा खर्च दाखवण्यात आल्याचे त्यांनी उघड केले. याशिवाय, रुग्णालयात विशाल इंटरप्रायझेसकडून घेतलेल्या औषधांचा कोणतीही तपासणी न करता पुरवठा करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या गंभीर आरोपांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील घोटाळ्यांचा पर्दाफाश:
|