विशेष बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज की जय....."च्या निनादात दुमदुमले गडहिंग्लज

Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai


By nisha patil - 2/20/2025 6:34:51 PM
Share This News:



छत्रपती शिवाजी महाराज की जय....."च्या निनादात दुमदुमले गडहिंग्लज

मिरवणुकीमध्ये गडहिंग्लजकरांचा उत्स्फूर्त सहभाग...

गडहिंग्लज येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करुन जल्लोषी मिरवणुकीची सुरुवात ना. हसन मुश्रीफांच्या हस्ते झाली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय....." या घोषणांच्या निनादात ही मिरवणूक नदीवेस येथील शिवाजी चौक,  महालक्ष्मी मंदिर,  कडगाव रोड, राजेंद्र प्रसाद रोड ते दसरा चौक अशी निघाली. यावेळी किरणआण्णा कदम, सतीश पाटील - गिजवणेकर, नरेंद्र भद्रापूर, मंजुषा कदम, राजू खनगावे, प्रा. शिवाजीराव भुकेले, राजशेखर दड्डी, सुरेश कोळकी, रमेश रिंगणे, विठ्ठल भमानगोळ,  यांच्यासह गडहिंग्लज शहरातील सर्व नागरिक उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराज की जय....."च्या निनादात दुमदुमले गडहिंग्लज
Total Views: 47