मनोरंजन

छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात...

Chhava movie in controversy


By nisha patil - 2/24/2025 3:36:43 PM
Share This News:



छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात...

 शिर्के घराण्याने दिला आंदोलनाचा इशारा!

 आज शिर्के घराण्याची महत्त्वाची बैठक

छावा' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असला तरी, त्यातील काही दृश्यांवर आता आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी वतनाच्या हट्टापायी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी मुघलांना मदत केल्याचं दाखवण्यात आलं आहे. यामुळे शिर्के घराण्याची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांच्या वंशजांनी केला आहे.या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या शिर्के वंशजांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज, २४ फेब्रुवारी रोजी पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात शिरकाई देवी मंदिरात शिर्के कुटुंबीय एकत्र येणार असून, दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या विरोधातील रस्त्यावरील तसेच न्यायालयीन लढाईची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे


छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात...
Total Views: 27