विशेष बातम्या

STP प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध – एकीच्या बळावर संघर्ष तीव्र

Citizens strongly oppose STP project


By nisha patil - 3/17/2025 4:50:21 PM
Share This News:



STP प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध – एकीच्या बळावर संघर्ष तीव्र

वर्षानगर, अरिहंत पार्क, वृंदावन पार्क, म्हाडा कॉलनी, एस.एस.सी बोर्ड एरिया, संभाजी हौसिंग सोसायटी आणि वेदांत रेसिडेन्सीतील नागरिकांनी STP प्रकल्पाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. जागरूक ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि महिलांनी एकजूट होत या प्रकल्पाला लोकशाही मार्गाने कडाडून विरोध केला आहे.

"हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे," असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात. नागरिकांच्या ऐक्याच्या ताकदीमुळे प्रशासनावर दडपण वाढले असून, हा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

लोकशाही जिंदाबाद! – या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, नागरिक आपल्या हक्कांसाठी लढण्यास सज्ज झाले आहेत. यावेळी
भाजपच्या जिल्हा अध्यक्ष रूपाराणी निकम  माजी नगरसेवक संग्रामसिंह निकम  माजी नगरसेवक महेश वासुदेव  माजी उपमहापौर भुपाल शेटे, माजी नगरसेवक परिवहन समिती सभापतीपदी अजित मोरे, प्रशांत गायकवाड, राजेंद्र तोडकरी, चंद्रशेखर देवडकर, उदय शेजाळे, किशोर पाटील, लोकशाही न्युज सतेज औंधकर, सुरज सुर्वे, रणजित खेडेकर, पप्पु खेडेकर, शफिक मुल्ला उपस्थित होते


STP प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध – एकीच्या बळावर संघर्ष तीव्र
Total Views: 23