बातम्या

हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी नागरिकांची रीघ....

CitizensReeg to Congratulate Hasan Mushrif


By nisha patil - 11/28/2024 7:53:59 PM
Share This News:



हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी नागरिकांची रीघ....

अबाल वृद्धांसह महिलांचाही सहभाग मोठा...

कागल, गडहिंगलज, उत्तुर् विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी आज त्यांच्या कागलमधील घराकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रीघ सुरू होती. कागल- गडहिंग्लज- उत्तुर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आबाल- वृद्धांसह महिलांचाही सहभाग मोठा होता.

आज सकाळीच साडेसात वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुश्रीफ कोल्हापुरात उतरले. कोल्हापूरहून कागलकडे येत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या कागल आगारासमोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

त्याचबरोबर  माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, श्रीमती प्रविता सालपे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. व्ही. पाटील, ए. वाय. पाटील- म्हाकवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, राजेंद्र माने, भीमगोंडा पाटील तसेच विविध संस्था- संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी भेटून अभिनंदन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही अभिनंदन......
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही निवडणुकीच्या तोंडावरच पाठिंबा दिला होता. संघटनेचे तालुकाध्यक्ष डाॅ. बाळासाहेब पाटील, संभाजीराव यादव, नितेश कोगनोळे, शिवाजी पाटील, आदी पदाधिकाऱ्यांनी एकत्रित भेटून अभिनंदन केले.


हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी नागरिकांची रीघ....