बातम्या
कुष्ठरोगमुक्त जिल्ह्यासाठी मोहीम हाती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 1/22/2025 5:22:04 PM
Share This News:
कुष्ठरोगमुक्त जिल्ह्यासाठी मोहीम हाती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
३० जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविणार...
जिल्ह्यात गतवर्षी १६७ कुष्ठरुग्ण आले आढळून...
जिल्ह्यात गेले नऊ महिन्यात १६७ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ३० जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मार्च २०२७ पर्यंत कुष्ठरोगमुक्त जिल्ह्यासाठी मोहीम हाती द्या, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी या बैठकीत दिले.
जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यामध्ये १६७ कुष्ठरुग्ण आढळून आलेत. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ३० जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या जिल्हा समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आलीय. मार्च २०२७ पर्यंत कुष्ठरोगमुक्त जिल्ह्यासाठी मोहीम हाती द्या, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी या बैठकीत दिलेत.
नवीन आढळलेल्या कुष्ठरुग्णांना त्वरित औषधोपचार देण्यात आलाय. नवीन शोधलेल्या सर्व कुष्ठरुग्णांच्या कुटुंबातील व रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या सदस्यांना कॅप्सुल रिफाम्पीसीनचा केवळ एक डोस देऊन त्यांना देखील कुष्ठरोगाचा संसर्ग होण्यापासून संरक्षण देण्यात आलंय. त्यामुळे कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपविण्यापेक्षा नजिकच्या शासकीय, निमशासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखान्यात जावून तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केले आहे.
कुष्ठरोगमुक्त जिल्ह्यासाठी मोहीम हाती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
|