ग्रामीण
तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
By nisha patil - 1/21/2025 2:59:35 PM
Share This News:
तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तृतीयपंथी, सेक्स वर्कर (वारांगना), देवदासी, तमाशा कलावंत आणि एचआयव्ही बाधित व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून ओळखपत्र मिळविण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात 20 व्यक्तींना डिजिटल रेशन कार्ड वितरीत करण्यात आले.
अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यक्तींचे आधार कार्ड तयार करून त्यांना मोफत अन्नधान्य वितरणासाठी पात्र करण्यात आले. यापूर्वी 25 व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्हाधिकारी येडगे यांनी उर्वरित 200 व्यक्तींना लवकरात लवकर ओळखपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले आहे.
तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
|