बातम्या
जिल्हाधिकारी लोकशाही दिन 3 मार्चला
By nisha patil - 2/25/2025 12:31:10 PM
Share This News:
जिल्हाधिकारी लोकशाही दिन 3 मार्चला
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार, 3 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात होणार आहे. नागरिकांनी शासकीय व निमशासकीय तक्रारींसाठी उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी आवाहन केले आहे.
तालुका, जिल्हा, विभागीय आणि मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्यात ठराविक सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. अर्ज विहित नमुन्यात भरून, 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठवावा. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आणि अपील प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत.
अधिक माहितीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूरच्या करमणूक शाखेत अर्ज सादर करावेत.
जिल्हाधिकारी लोकशाही दिन 3 मार्चला
|