ग्रामीण
रस्त्यावर कचरा दिसल्यास सरपंच व ग्रामसेवकांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी येडगे
By nisha patil - 1/22/2025 5:24:13 PM
Share This News:
रस्त्यावर कचरा दिसल्यास सरपंच व ग्रामसेवकांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी येडगे
उद्यापासून जिल्हाधिकारी येडगे अचानक गावांना भेटी देणार
करवीर तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या गावाच्या प्रवेशद्वारापासून अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो सूचना देऊनही दुर्लक्ष करत असल्यामुळे आता रस्त्यावर कचरा दिसल्यास सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई होणार असे जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी सांगितले.
कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या गावाच्या प्रवेशद्वारापासून अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो. वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष होत असल्यामुळे आता मुख्य रस्त्यापासून गावाकडे प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर कचरा दिसल्यास सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई होणार आहे. असे जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी सांगितले. उद्यापासून अचानक भेटी देण्यात येणार असून ज्या गावांमध्ये रस्त्यावर कचरा आढळून येईल त्या गावांतील सरपंच व ग्रामसेकांवर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात करवीर तालुक्यातील १४ व हातकणंगले तालुक्यातील ४ अशा १८ गावातील सरपंच व ग्रामसेवकांची बैठक पार पडली.
रस्त्यावर कचरा दिसल्यास सरपंच व ग्रामसेवकांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी येडगे
|