बातम्या
जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी
By nisha patil - 11/28/2024 7:53:11 PM
Share This News:
जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी
जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दि. 2 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.
तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.
जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी
|