बातम्या

कोरोचीतील विकास कामांचा शुभारंभ

Commencement of development works in Korochi


By nisha patil - 10/14/2024 9:25:01 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे २५-१५ योजनेंतर्गत ५७ लाख रुपयांच्या निधीतून कोरोची येथील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. हा समारंभ डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला, ज्यावेळी भागातील नागरिकांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले.

या कार्यक्रमाला कोरोची गावचे प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने नागरिक व महिलांची उपस्थिती होती.


कोरोचीतील विकास कामांचा शुभारंभ