बातम्या
मनकर्णिका कुंडाचे काम ३ महिन्यांत पूर्ण करा...
By nisha patil - 2/24/2025 3:02:04 PM
Share This News:
मनकर्णिका कुंडाचे काम ३ महिन्यांत पूर्ण करा...
हिंदू जनजागृती समितीची मागणी...
श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने तीन महिन्यांत पूर्ण करण्याची मागणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली.
या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी सुशोभीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.तरी हे कुंड लवकरात लवकर खुले करून येणार्या भाविकांनी त्याची पूर्ण माहिती होण्यासाठी मनकर्णिका कुंडांवर त्यांचे धार्मिक महत्व दर्शवणारे माहितीचे फलक आणि त्याची छायाचित्रे लावावीत, अशीही मागणी या प्रसंगी करण्यात आली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक सुनील घनवट,. शिवानंद स्वामी, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक अभिजित पाटील, हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री आनंदराव पवळ, अमर जाधव, शरद माळी, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, करवीरतालुकाप्रमुख राजू यादव आदी उपस्थित होते..
मनकर्णिका कुंडाचे काम ३ महिन्यांत पूर्ण करा...
|