शैक्षणिक
विवेकानंद मध्ये “क्लिनिकल रिसर्च” मधील नोकरीच्या संधी विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 1/17/2025 9:17:50 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये “क्लिनिकल रिसर्च” मधील नोकरीच्या संधी विषयावर व्याख्यान संपन्न
येथील विवेकानंद कॉलेजच्या सुक्ष्मजीवशास्त्र व बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या संयुक्त् विद्यमाने जॉब ॲपॉर्च्युनिटीज इन क्लिनिकल रिसर्च या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी अल्केमी क्लिनिकल रिसर्चचे संस्थापक व कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत मुन्शी यांनी कोरोना संसर्ग व त्यानंतर औषध निर्मिती शास्त्र व आरोग्य्ा विभागासमोर असणारी आव्हाने व भविष्यात येणाऱ्या या विषयातील तज्ञ तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेता क्लिनिकल रिसर्च, मेडिकल कोडिंग, क्लिनिकल डाटा अनॅलेसेस या क्षेत्रात भविष्यात उपलब्ध असणाऱ्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्लिनिकल रिसर्च या विषयात असलेल्या नोकरीच्या संधी व त्यासाठी लागणारे विविध अभ्यासक्रम तसेच हे अभ्यासक्रम घेणाऱ्या संस्था यांची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.
सदर व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते. प्रास्ताविक प्रा.एस.जी.कुलकर्णी यांनी केले. प्रा. एस.एस. शेख यानी आभार मानले. सदर व्याख्यानाचे आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. टी.सी.गौपाले, सुक्ष्मजीवशास्त्र व बायोटेक्नॉलॉजी विभागातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
विवेकानंद मध्ये “क्लिनिकल रिसर्च” मधील नोकरीच्या संधी विषयावर व्याख्यान संपन्न
|