राजकीय

काँग्रेस, वंचित आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल...

Congress Vanchit Aghadi workers join BJP


By nisha patil - 3/17/2025 4:39:08 PM
Share This News:



काँग्रेस, वंचित आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल...

दत्तवाड येथे भाजप पक्षप्रवेश व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जनजागृती कार्यक्रम संपन्न 

 दत्तवाड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि महिला बचत गट योजनांसंदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाजप अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस व विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटरच्या मालक आशिया गवंडी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच शिरोळ तालुका विश्वकर्मा योजना अध्यक्ष सुधीर शहापुरे यांनी योजनेच्या विविध लाभांविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बिरणगे, वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील शिंगे, बाळासो बिरणगे, संजय बिरणगे यांच्यासह रमेश खरपी, कुमार हेरवाडे आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजप कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष (किसान मोर्चा) राजगोंडा पाटील यांनी 157 महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल उपस्थित महिलांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपा मागासवर्गीय सेल शिरोळ तालुका उपाध्यक्ष तेजस वराळे, भाजपा दत्तवाड अध्यक्ष कुमार पाटील, अशोक नेर्ले, सुनील कुंभार, कलगोंडा पाटील, योजना लाभार्थी जयदीप सुतार, माणिक सुतार तसेच घोसरवाड, राजापूर, नवे दानवाड, खिद्रापूर, जुने दानवाड आणि दत्तवाडसह अनेक गावांतील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काँग्रेस, वंचित आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल...
Total Views: 46