बातम्या

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर काँग्रेसचा हल्लाबोल; 'झिजीया कर थांबवा, दर कमी करा' – हर्षवर्धन सपकाळ

Congress attacks petrol

By nisha patil - 7/4/2025 9:05:17 PM
Share This News:

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर काँग्रेसचा हल्लाबोल; 'झिजीया कर थांबवा, दर कमी करा' – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, ७ एप्रिल २०२५ – आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचा दर केवळ ६५ डॉलर प्रति बॅरल असतानाही भारतात पेट्रोल १०९ आणि डिझेल ९३ रुपयांवर असल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत भाजप सरकार इंधनावर झिजीया कर लावून जनतेची लूट करत असल्याचा आरोप केला. त्यांनी पेट्रोल ५१ आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करण्याची मागणी करत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.

सपकाळ यांनी सांगितले की, युपीए काळात क्रूडचे दर १४५ डॉलर असूनही पेट्रोल ७० आणि डिझेल ४५ रुपये होते. भाजपने एक्साईज टॅक्स ३२ रुपये आणि रोड सेस १८ टक्क्यांवर नेला असून, एलपीजी सिलिंडरही दुप्पट झाला आहे.

रशियाकडून स्वस्तात क्रूड घेऊन खास कंपन्यांना फायदा दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. "पूर्वी पेट्रोल २ रुपयांनी वाढले तरी ट्विट करणारे सेलिब्रिटी आता गप्प का?" असा सवालही त्यांनी केला.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर काँग्रेसचा हल्लाबोल; 'झिजीया कर थांबवा, दर कमी करा' – हर्षवर्धन सपकाळ
Total Views: 23