राजकीय

तर कर्नाटकात काँग्रेस होणार आणखी मजबूत...

Congress will be stronger in Karnataka


By Administrator - 1/15/2025 3:20:03 PM
Share This News:



बंगळूरू: महाराष्ट्रात विरोधी पक्षात फूट पडल्यानंतर आता कर्नाटकमध्ये काँग्रेस आपल्या सरकारला आणखी मजबूत करण्यासाठी विरोधी पक्ष फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवगंगा बसवराज यांनी माध्यमांशी संवाद साधताना दावा केला की, "जेडीएसचे ११ आमदार लवकरच काँग्रेसमध्ये सहभागी होतील. डीके शिवकुमार पक्ष संघटनेत सर्वांना एकत्र आणत आहेत. इतर कोणालाही हे शक्य होणार नाही."

तसेच त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करत म्हटले की, "काही लोकांना केवळ सत्ता हवी आहे. काहीजण म्हणतायेत, शिवकुमार यांना असे ऑपरेशन करू द्या, मग आम्ही पाहू. ते फक्त आयत्या बिळावर नागोबा आहेत, पण शिवकुमार सतत काम करत राहतात."

 


तर कर्नाटकात काँग्रेस होणार आणखी मजबूत...
Total Views: 153