बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयावर १० मार्चला ठेकेदारांचा मोर्चा...
By nisha patil - 5/3/2025 3:37:56 PM
Share This News:
जिल्हाधिकारी कार्यालयावर १० मार्चला ठेकेदारांचा मोर्चा...
निवेदने देऊनही शासनाने बिले दिली नाहीत
ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाने दिली नाहीत. थकित बिलांच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघावतीने सोमवारी १० मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केलेल्या कामांची ९० हजार कोटी रुपयांची बिले राज्य शासनाने थकविली आहेत. निवेदने देऊनही शासनाने बिले दिलेली नाहीत. त्यामुळे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठेकेदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयांवर सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर १० मार्चला ठेकेदारांचा मोर्चा...
|