बातम्या
भाजप संघटन बळकटीसाठी कार्यकर्ता-लोकप्रतिनिधी समन्वय आवश्यक – चंद्रकांत पाटील
By nisha patil - 8/2/2025 7:51:29 PM
Share This News:
भाजप संघटन बळकटीसाठी कार्यकर्ता-लोकप्रतिनिधी समन्वय आवश्यक – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर (दि. 08) – भारतीय जनता पक्ष संघटनेच्या आधारावर चालणारी पार्टी असून, सरकार व संघटनेत समन्वय ठेवून पुढील वाटचाल होणार असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, आगामी सभासद नोंदणी अभियान, बूथ संघटन आणि विकासकामांवर भर देण्याची आवश्यकता आहे. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना योग्य जबाबदाऱ्या देण्यात येतील. यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप संघटन बळकटीसाठी कार्यकर्ता-लोकप्रतिनिधी समन्वय आवश्यक – चंद्रकांत पाटील
|