बातम्या
गिरोली घाट व केखले शिव येथे गव्यांचा धुमाकूळ – वन खात्याचे दुर्लक्ष, शेतकरी हवालदिल
By nisha patil - 7/2/2025 7:23:15 PM
Share This News:
गिरोली घाट व केखले शिव येथे गव्यांचा धुमाकूळ – वन खात्याचे दुर्लक्ष, शेतकरी हवालदिल
गिरोली घाट व केखले शिव परिसरात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस आणि शाळू पिकांवर गव्यांनी तुडवून मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात असून त्यांना आर्थिक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाकडे तक्रारी केल्या असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन आणि वनखात्याने लवकरात लवकर पावले उचलून गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.a
गिरोली घाट व केखले शिव येथे गव्यांचा धुमाकूळ – वन खात्याचे दुर्लक्ष, शेतकरी हवालदिल
|