बातम्या
पन्हाळा येथे रानडुक्कराची शिकार; ११ जणांना अटक
By nisha patil - 2/28/2025 12:27:45 PM
Share This News:
पन्हाळा येथे रानडुक्कराची शिकार; ११ जणांना अटक
पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर – पन्हाळा वनपरिक्षेत्रातील वेखंडवाडी येथे रानडुक्कराची शिकार केल्याप्रकरणी ११ जणांना वनविभागाने रंगेहात पकडले. आरोपी रानडुक्कराचे मांस वाटून घेत असताना ही कारवाई करण्यात आली.
या आरोपीकडून रानडुक्कराचे मांस व डोके ३ कोयते, १ विळा, १ सत्तूर लाकडी ओंडका आणि तळवट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला
या प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत आरोपींच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.
वन्यप्राण्यांची शिकार करणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास 1926 (हेलो फॉरेस्ट टोल-फ्री क्रमांक) किंवा जवळच्या वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे आवाहन वन विभागाने केले आहे
ही कारवाई मा. उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद व सहाय्यक वनसंरक्षक . कमलेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी . अनिल मोहिते, परिमंडळ वनअधिकारी पन्हाळा श्सागर पटकारे, वनरक्षक पन्हाळा संदिप पाटील, वनरक्षक राक्षी . योगेश पाटील, वनरक्षक कोतोली बाजीराव देसाई, लिपीक सुरेश हिंदूराव पाटील, सचिन जाधव, रंगराव उदाळे, शांताराम अस्वले, आर आर टी टीम यांनीकेले
पन्हाळा येथे रानडुक्कराची शिकार; ११ जणांना अटक
|