बातम्या
क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने चंद्रदीप नरके यांची आमदार पदी निवडीबाबत सत्कार"
By nisha patil - 12/26/2024 2:30:53 PM
Share This News:
काल रेसिडेन्सी क्लब येथे, क्रिडाई कोल्हापूर यांच्या मार्फत चंद्रदीप नरके यांची आमदार पदी निवडीबाबत सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर शहर व जिल्ह्याचा विकास व नियोजन यासंदर्भात सुसंवादी चर्चा झाली. या प्रसंगी त्यांच्यासोबत कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, सचिव संदीप मिरजकर, संस्थेचे इतर आजी-माजी सदस्य, सभासद, कर्मचारी, आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने चंद्रदीप नरके यांची आमदार पदी निवडीबाबत सत्कार"
|