बातम्या

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या एकास अटक....

Crime news


By nisha patil - 7/29/2024 2:21:56 PM
Share This News:



अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या एकास अटक....

दोघांना मदत करणाऱ्यालाही घेतले ताब्यात...

शिराळा तालुक्यातील एका गावातील दहावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सव्वीस वर्षे युवक व त्यास पळून जाण्यास मदत करणाऱ्या मित्राला शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती.

मुलीच्या वडिलांनी बरी शोधा शोध घेत केली मात्र ती कुठेच आढळून आली नाही. शिराळा पोलिसांनी शोध घेतला असता तपासात एका मुलाचे नाव समोर आले. पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पाटील,  नितीन यादव, शरद पाटील, विकास शिंदे यांनी तपास करून संशयित हा आपल्या बहिणीकडे  पेन या ठिकाणी असल्याचे समजले. पोलिसांना या दोघांना अटक केली असून यांना मदत करणाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे.


अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या एकास अटक....