बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये सांस्कृतिक दिन संपन्न

Cultural day held at Vivekananda College


By nisha patil - 7/26/2024 3:51:43 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेजमध्ये  सांस्कृतिक  दिन संपन्न

 महाराष्ट्र शासनाच्या  शिक्षण आणि  सांस्कृतिक विभागामार्फत  विद्यार्थ्यांच्या शालेय विकासासोबत सहशालेय उपक्रमांमधून सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी  शिक्षण केंद्रांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . शैक्षणिक वर्ष 2020 पासून महाराष्ट्र राज्य नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले आहे 

 या पार्श्वभूमीवर चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताहाचे आयोजन दिनांक 22 जुलै ते दिनांक  28 जुलै 2024 अखेर करण्यात येत आहे .  

विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथील ज्युनियर विभागात प्रविष्ट असणाऱ्या आर्ट्स कॉमर्स आणि   सायन्स विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी करिता या शैक्षणिक सप्ताहातील चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिन अंतर्गत चित्रकला, अभिभाषण ,काव्य वाचन, गीत गायन या स्पर्धांचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले . हा दिवस भारताच्या संस्कृती विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला सदरच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या चित्रांचे आरेखन केले . काव्य वाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले . तर इयत्ता अकरावी कॉमर्स मधील विद्यार्थ्यांनी भावगीत गायिले .

सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी सदैव सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहावी असे मत प्राधिक असो गीतांजली सांके यांनी प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात मानले.    
 
अध्यक्षीय मनोगत ज्युनिअर आर्ट्स कॉमर्स प्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने लिलया पेलण्यासाठी सर्व सहशालेय उपक्रमात सहभागी होऊन आपल्यामध्ये आत्मविश्वास बानवून घ्यावा असे मत उद्घाटन प्रसंगी मांडले.  

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ यु. आर. हिरकुडे  यांनी केले .तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख  प्रा. यु. एच. तिजाईकर यांनी मानले. कार्यक्रमाचे  आयोजन प्रा. अनिल धस  प्रा. सौ. एम. पी. गवळी, स्टाफ सेक्रेटरी प्रा. किशोर गुजर, प्रा नितीन हिटनीकर, प्रा सौ ए पी पाटील केले होते 


विवेकानंद कॉलेजमध्ये सांस्कृतिक दिन संपन्न