बातम्या

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे 8 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये ‘टॉप-10’मध्ये

D Y 8 students of Patil Technical Campus


By nisha patil - 3/8/2024 9:05:29 PM
Share This News:



डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे 8 विद्यार्थी
 

शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये ‘टॉप-10’मध्ये
 

तळसंदे/वार्ताहर शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल - मे २०२४ च्या अंतिम वर्षाच्या  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये तळसंदे  येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस या स्वायत्त महाविद्यालयाच्या 8 विद्यार्थ्यानी विद्यापीठ गुणवत्ता यादीत ‘टॉप-10’मध्ये येण्याचा मान मिळवला आहे. यांत्रिक अभियांत्रिकीच्या स्नेहल शामराव खोराटे आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकीच्या राजेश संतोष वाळके यांनी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

  शिवाजी विद्यापीठामार्फ़त सन २०२३-२४ च्या अंतिम सत्राच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या.  या परीक्षेच्या निकालात गुणवत्ता यादीवर टेक्निकल कॅम्पसच्या सर्व  विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे.  यामध्ये यांत्रिक अभियांत्रिकीचे कु स्नेहल शामराव खोराटे (प्रथम), प्रतीक्षा संभाजी घाटगे (तृतीय), संगणक विज्ञान अभियांत्रिकीचा राजेश संतोष वाळके (प्रथम) व कु निकिता नामदेव बेनके (तृतीय), स्थापत्य अभियांत्रिकीचा विवेक संग्रामसिंह घाटगे (द्वितीय), विद्युत अभियांत्रिकीचा निशांत नरेश साटम (द्वितीय) इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीचा ओंकार आनंदराव पाटील (तृतीय),  राहुल अशोक चौगले (सातवा ) यांनी ‘टॉप-10’ मध्ये स्थान मिळवले आहे. 
    
या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हद्वारे टीसीएस, विप्रो सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर यांनी सांगितले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कॅम्पस मधील सर्व विभागाचे प्रमुख व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले. 
    
 संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील , विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील , पृथ्वीराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील,  कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता , कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतिश आर. पावसकर, रजिस्ट्रार प्रकाश भागाजे,  डीन अकॅडेमिक्स प्रा आर. एस. पोवार यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे 8 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये ‘टॉप-10’मध्ये