शैक्षणिक
डी. वाय. पाटील फार्मसीच्या सिमरन व अपेक्षाचे यश
By nisha patil - 2/25/2025 8:55:16 PM
Share This News:
डी. वाय. पाटील फार्मसीच्या सिमरन व अपेक्षाचे यश
कोल्हापूर, दि. २५: डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या सिमरन जमीर पाटवेगार व अपेक्षा चित्रे यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
🔹 सिमरन पाटवेगार – राष्ट्रीय संशोधन संमेलन "पायोनिअर 2025" मध्ये ‘सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार’
🔹 अपेक्षा चित्रे – राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक
सिमरनने "आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग फॉर ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी ऑफ अस्पिरिन" हा प्रकल्प सादर केला व परीक्षकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार पटकावला.
तर अपेक्षाने "सोशल मीडिया आणि आजची युवा पिढी" या विषयावर प्रभावी भाषण सादर करून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दोघींचे अभिनंदन केले आहे.
डी. वाय. पाटील फार्मसीच्या सिमरन व अपेक्षाचे यश
|