बातम्या

डी वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद

DY Patil Medica team won the title


By nisha patil - 12/30/2024 10:02:53 PM
Share This News:



डी वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद
 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा
 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद तर स्कूल ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटने उपविजेतेपद पटकावले.

 डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ अक्षय कोकीतकर, प्रा. निखिल नायकवडी, सुशांत कायपुरे, रोहन बुचडे सर्व कॉलेजचे स्पोर्ट्स इन्चार्ज उपस्थित होते.

 अंतिम सामना मेडिकल कॉलेज व स्कूल ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंट या दोन संघात झाला प्रथम फलंदाजी करताना इंजिनिअरिंग कॉलेजचा राज घोरपडे 42 धावा (30 चेंडू) व विवेक जाधवच्या 25 धावांच्या (19 चेंडू) जोरावर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ने 20 षटकात ७ गडी  गमावून  132 धावा केल्या. ध्रुव जसवाल (४५) व आदित्य देवल (४३)यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मेडिकल कॉलेजचे हे आव्हान 19 षटकात पार करत विजेतेपदाला गवसणी घातली.   मेडिकल कॉलेजच्या विक्रमादित्य देशमुख याने उत्कृष्ट गोलंदाजी करत चार षटकात एकूण 26 धावा देऊन दोन गडी बाद केले. 

   कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त मा. आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. 


डी वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद
Total Views: 34