बातम्या

डी वाय पाटील विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल

DY Patil University will gain global reputation


By nisha patil - 1/9/2024 7:27:30 PM
Share This News:



प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय घेणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झालेल्या कसबा बावड्यात यशंतराव पाटील यांनी शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांचे पुत्र डी. वाय पाटील यांनी सुरू केलेल्या उच्च शिक्षण  देणाऱ्या संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला नॅक कडून A++ हे सर्वोत्तम नामांकन मिळणे हे  अभिमानास्पद असून, विद्यापीठ भविष्यात जागतिक पातळीवर  नावलौकिक करेल असा विश्वास माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठच्या १९ व्या स्थापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात श्रीनिवास पाटील यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सयाजी हॉटेलच्या विक्टोरिया सभागृहामध्ये डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचा १९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. तत्पूर्वी डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रांगणात कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते ध्वज वंदन होऊन विद्यापीठ गीत म्हणण्यात आले. यावेळी एनसीसी कॅडेटने मानवंदना दिली.

 हॉटेल सयाजी येथे झालेले कार्यक्रमात डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीला पुनःपरिक्षणात नॅक चे 'ए प्लस प्लस' मानांकन मिळाले  असून त्याच्या लोगोचं अनावरण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर यानंतर कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना डॉ.डी.वाय.पाटील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या जीवन प्रवासावरील चित्रफित  दाखविण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, रजिस्टार व्ही.बी. भोसले, अधिष्ठता डॉ. राकेश कुमार शर्मा आधी व्यासपीठावर उपस्थित होते. 

   यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील यांनी डॉ. डी.वाय.पाटील दादा यांच्यासोबत साठ वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. छत्रपती शाहू महाराजांनी  शैक्षणिक धोरनांचा वारसा  यशवंत पाटील व डी वाय पाटील यांनी पुढे चालवला. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केले. डी वाय पाटील यांनी लावलेल्या रोपटेचे वटवृक्षात रूपांतर करून त्यावर गुणवत्तेची तरुण बांधण्याचे काम डॉ. संजय पाटील, सतेज पाटील व  पुढील पिढी करत आहे. A++ प्राप्त हे विद्यापीठ भविष्यात जागतिक पातळीवर सुद्धा आपलं नावलौकिक करेल. गोरगरिबांची कोट्यावधी रुपयांची शिक्षण फी माफ करणारी देशातील ही एकमेव युनिव्हर्सिटी असेल असे गौरव उद्गार त्यांनी काढले. आमचे मित्र डॉ. डी वाय पाटील यांच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना आपल्याला विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.


आमदार सतेज पाटील म्हणाले, विद्यापीठाला मिळालेला 'ए प्लस प्लस मानांकन' हा क्षण सुवर्णक्षणात लिहून ठेवण्यासारखा आहे. राज्यात शैक्षणिक आणि आर्थिक संपन्नता आणण्याचे काम सस्था करत आहे. या मानांकनामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे, रिसर्च व इनोवेशन मध्ये चांगले काम करून जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.   डी वाय पाटील हॉस्पिटल च्या माध्यमातून गोरगरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा मोफत पुरवल्या जात आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या विषयी बोलताना मराठमोळ्या मातीतील एक व्यक्तिमत्व राज्यपाल पदापर्यंत जातात हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

कुलपती डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले,   विद्यापीठाला नॅक चे 'ए प्लस प्लस' मानांकन मिळणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.  सुरुवातीला 'ए प्लस' हे मानांकन मिळाले मात्र  आम्ही अपील करण्याचे धाडस केले. हे सर्वोच्च मानांकन मिळवून देशातील २३ वे व राज्यातील पाचवे विद्यापीठ बनण्याचा मान मिळाला. आता ऑनलाईन कोर्सेस, संशोधनावर भर देऊन  जागतिक विद्यापीठांचे यादीमध्ये स्थान मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील.

श्रीनिवास पाटील आणि डॉ. डी वाय पाटील यांची साठ वर्षे ऋणानिबंध  आहेत. संस्थेचे उभारणीच्या काळात पाटील यांची मोठी मदत झाली. आकुर्डी येथील जमीन त्यांच्या सूचनेसर खरेदी केली आणि आज तेथे एज्युकेशन हब तयार झाले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे डॉ. संजय डी पाटील यांनी सांगितलं


कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी, विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. विद्यापीठावर मिळाली विधिमानांकने यश पुरस्कार याबाबतचा आढावा मांडला. 


यावेळीपुरस्कार प्राप्त उत्कृष्ट कर्मचारी अजित फराकटे यांनी मनोगत व्यक्त करताना आई साहेबांच्या नावाने हा पुरस्कार मिळत आहे ही आपल्या आयुष्याची पुण्याई असल्याचे सांगितले.

उत्कृष्ट शिक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी 26 वर्ष या संस्थेत कार्यरत होतो आयुष्यातील चांगले वर्ष या ठिकाणी व्यतीत केली त्यामुळे आपला आयुष्य लागल्याच्या भावना व्यक्त केल्या.

कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले यांनी प्रास्तावित केले तर विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी आभार मानले.

यावेळी अडव्हायझर सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवराज पाटील, डॉ. बी. पी. साबळे सर, सारंग पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आयक्युएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, सी.एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षक डॉ . वैशाली गायकवाड, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अजित पाटील, डॉ. अमृतकूवर रायजदे, डॉ. उमारणी जे., डॉ. आर. एस. पाटील, रुधिर बर्देस्कर, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशिल इंगळे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य,  विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान
 या वेळी सौ.शांतादेवी डी. पाटील बेस्ट एम्पलॉई अवॉर्ड  बाबुराव गावडे, उज्वला अशोक मेथे, राजू शेट्टी, प्रकाश मुळे, अजित फराकटे यांचा तर डी वाय पाटील बेस्ट टीचर अवॉर्डने डॉ प्रदीप पाटील, डॉ रमेश निगडे, डॉ. प्रकाश कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. विविध परीक्षां व स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


डी वाय पाटील विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल