पदार्थ

दहीभात, एक आयुर्वेदिक औषध.....

Dahibhaat


By nisha patil - 10/2/2025 12:53:06 AM
Share This News:



जाणून घेऊया दही भात खाण्याचे फायदे...

वजन कमी होते...
दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते. कॅरलीज घटतात. 

तापावर...
ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते. 

पोट बिघडले...
पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते. अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.

बद्धकोष्ठता...
तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात. त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

तणावमुक्ती...
 दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.


दहीभात, एक आयुर्वेदिक औषध.....
Total Views: 49