राजकीय

शाहूंच्या ऋणातून उतराई होण्याचा दलित कार्यकर्त्यांचा निर्धार

Dalit nirdhar


By nisha patil - 10/31/2024 7:30:37 PM
Share This News:



कागल,प्रतिनिधी. छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घाटगे घराण्याचे दलित समाजाशी ऋणानुबंध आहेत. दीपावलीच्या पूर्वसंध्येला याच कौटुंबिक नात्यातून कागल, गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील वैचारिक लढाईमध्ये आंबेडकरी चळवळीतील आरपीआयच्या विविध पक्ष व संघटना यांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी फार मोठे आशीर्वादच आहेत.असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.

 

  आरपीआयच्या विविध संघटना यांनी काल दिलेल्या पाठिंब्यानंतर कागल येथे झालेल्या गटांचे नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

 

 समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले,कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात बहुजन समाजाचा पालकमंत्र्यांनी पंचवीस वर्षे फक्त मतापुरता वापर करून घेतला. आज तरुण मोठ्या संख्येने व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडले आहेत. पालक मंत्र्यांच्या या स्वार्थी राजकारणात एक पिढी पूर्णतःबरबाद झाली आहे.

 

 स्वर्गीय विक्रमसिंहजी घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांनी बहुजन समाजास पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. मात्र पालकमंत्री समाज व जातवाईज मेळावे घेऊन त्यांच्यामध्ये फूट पाडत आहेत.आम्ही आपल्या सर्वांच्या साथीने छत्रपती शाहू महाराजांचे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकसंघ आदर्श कागल निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत. परिवर्तनाच्या या लढाईत शाहू महाराजांच्या वंशजाच्या पाठीशी आंबेडकरांच्या विचारांच्या अनुयायांच्या आशीर्वादामुळे मोठे बळ मिळाले आहे.बहुजन समाजाची होणारे फसवणूक मला थांबवायची आहे. त्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. मताच्या राजकारणासाठी सिद्धनेर्लीतील दलित समाजातील जमिनीच्या प्रकरणाचे ते चुकीच्या पद्धतीने भांडवल करीत आहेत.यामध्ये जर चुकीचे असेल तर तुम्ही पालकमंत्री आहात चौकशी करून कारवाई करा.मात्र माझा तुम्हाला सवाल आहे? तुम्ही समाजासाठी एक गुंठा जमीन दिल्याचे दाखवा. मी राजकारण सोडतो.

 

  

राष्ट्रीय नेते बाबासाहेब वडगावकर म्हणाले, दलितांनी नेतृत्वासाठी पुढे येण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने प्रोत्साहन दिले. दलित समाज व छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचे पिढ्यांपिढ्याचे ऋणानुबंध आहेत. या ऋणानुबंधातून उतराई होण्याची संधी समरजितसिंह घाटगे यांना आमदार करून दलित समाजाला मिळाली आहे.

 

चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज असलेल्या समरजितराजे यांच्यासारख्या उच्चशिक्षित व विकासाचे विजन असलेल्या नेतृत्वाला आमदार म्हणून निवडून देण्यात दलित समाज आघाडीवर असेल. मुश्रीफ साहेब हे विसरू नका मागल्या वेळी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला म्हणूनच तुम्ही निवडून आलात यावेळी आमची पूर्ण ताकद राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी लावू मुश्रीफ साहेब आज तुम्ही जातीवादी पक्षाच्या वळचणी जाणे दलित बांधव हे कधीही सहन करणार नाहीत. त्यामुळे मुश्रीफ साहेब याना त्यांची जागा दाखवण्यासाठीआज आंबेडकरी जनता पुढे सरसावली आहे.

 

 यावेळी दयानंद व्हनाळीकर जयसिंग जाधव,पांडुरंग कांबळे, बाळासाहेब बेलेकर, हर्षद कांबळे, दयानंद कांबळे, भीमराव कांबळे, नामदेव कांबळे, अक्षय कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.राज कांबळे यांनी स्वागत केले.अभिजीत कांबळे यांनी आभार मानले.

 

 छायाचित्र कागल येथे आरपीआय गटाच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे शेजारी बाबासाहेब वडगावकर,बाळासाहेब बेलेकर, पांडुरंग कांबळे,जयसिंग जाधव व इतर

 

 

 *महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध* 

 

कागलमध्ये पैशाचे मोठ्या प्रमाणात आमिष दाखवले जात आहे. नागरिकांवर दबाव आणला जात आहे. यावर कहर म्हणजे गैबी चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर शिवीगाळ करून दादागिरीची भाषा वापरून संविधानाचा अवमान केला जात आहे.

 

 त्यासाठीची स्क्रिप्ट पालकमंत्र्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना पुरवण्यात येते. मुश्रीफसाहेब मुद्द्याचं बोला, विकासावर बोला. तुम्हाला खालच्या दर्जाचे शब्द का वापरावी लागतात? स्वतःला पुरोगामी समजता परंतु भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अपशब्द वापरताना तुम्हाला काहीच का वाटत नाही? छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो.


शाहूंच्या ऋणातून उतराई होण्याचा दलित कार्यकर्त्यांचा निर्धार