विशेष बातम्या
कोल्हापूर- पन्हाळा रत्नागिरी महामार्गावर अपघातांचा धोका
By nisha patil - 2/2/2025 12:35:57 PM
Share This News:
कोल्हापूर- पन्हाळा रत्नागिरी महामार्गावर अपघातांचा धोका
पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर,
गेले दोन-तीन वर्ष कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचे काम चालू आहे. दररोज चार-पाच छोटे ,मोठे अपघात घडत आहेत. फक्त वाघबिळ घाटात सुरुवातीलाच नलवडे बंगल्या जवळ पाणी मारले जाते. घाटात ज्या ज्या ठिकाणी काम चालू हे इतर कुठेही पाणी मारले जात नाही.
त्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत आहे. मोटरसायकल कार ड्रायव्हर गाडी चालवत असताना डोळ्यात धूळ जाऊन अनेक अपघात घडत आहेत. .तसेच काम चालू असल्यामुळे रस्त्याला अनेक खड्डे पडले आहेत. महामार्गासाठी काम करणारे वाहने, ट्रक ,डंपर, जे. सी. बी रस्त्याने जात असल्यामुळे वाहनांना गाडी चालवणे चालकास जीवावर येत आहे. काम करणाऱ्या वाहनां मधून खडी, रेती, वाळू रस्त्याने पडत आहे.त्यावरून टू व्हीलर स्लीप होऊन अनेक अपघात घडत आहेत. लोकांना एकतर किरकोळ दुखापत होत आहे किंवा मोठा जीव घेणे अवयव निकामी होणे असे अपघात घडत आहेत. या अपघाताला जबाबदार कोण? असा सर्वसामान्य जनतेत प्रश्न निर्माण झाला आहे. अक्षरशा जीव मुठीत धरून चालकास गाडी चालवावी लागत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने या घाटात कसल्याही प्रकारचे सुरक्षा ठेवली नाही. त्यामुळे अनेक लोक खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. कायमस्वरूपी 108 ॲम्बुलन्स या घाटात ठेवायला पाहिजे, अशा रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चर्चा होत आहे. या सुरक्षेतेच्या दृष्टीने या महामार्गाच्या कॉन्टॅक्टर ने पण लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने यावर वचक ठेवणार का? नाही ? का ? रोज अपघाताची नोंदच घेत बसणार आहे, एक तर हजारो झाडे तोडून पर्यावरणाचा ह्रास केला आहे.जमिनीची धूप वाढवली आहे.सामान्य माणसाचे सध्या हा महामार्ग जीव घेत आहे.मग असा विकास काय कामाचा हा प्रश्न . रोज कामाला जाणारे, कष्टकरी, नोकर, शिक्षणासाठी, शेतकरी ,कामगार वर्ग रुग्ण, यांच्यात निर्माण झाला आहे त्यावर स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी सर्वसामान्य ची मागणी आहे.
कोल्हापूर- पन्हाळा रत्नागिरी महामार्गावर अपघातांचा धोका
|