बातम्या

शाहूपुरीत १३ लाखांची धाडसी लूट; चार आरोपींना अटक

Daring robbery of 13 lakhs in Shahupuri


By nisha patil - 8/20/2024 9:37:05 PM
Share This News:



शाहूपुरी येथील लॉ कॉलेज चौकातील गजलता आर्केडमध्ये शनिवारी एका व्यावसायिकाच्या कामगाराकडून दोन अज्ञात व्यक्तींनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून १३ लाख रुपयांची लूट केली. या घटनेनंतर कामगार लक्ष्मण काणेकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान, पोलिसांनी बाळकृष्ण उर्फ बाळू श्रीकांत जाधव, अमरजीत अशोक लाड, आशिष नीलकंठ कागले, आणि अभिषेक विजय कागले या आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून १३ लाख २९ हजार ४०० रुपयांपैकी ११ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, वाहनं, एअर प्रिस्टल, चाकू, आणि तीन मोबाइल हँडसेट असा एकूण ३२ लाख ३१ हजार ४० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

या कामगिरीसाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि शहर डीवायएसपी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी विशेष प्रयत्न केले.
 


शाहूपुरीत १३ लाखांची धाडसी लूट; चार आरोपींना अटक