विशेष बातम्या

ताराबाई पार्कमध्ये ‘मृत्यूचा खड्डा’ – 

Death Pit in Tarabai Park


By nisha patil - 3/22/2025 8:24:18 PM
Share This News:



ताराबाई पार्कमध्ये ‘मृत्यूचा खड्डा’ – 

प्रशासन झोपेत की दुर्घटनेची वाट पाहतंय?

ताराबाई पार्क पितळी गणपती चौकात गेल्या तीन महिन्यांपासून मोठा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडतोय.

कधी पाणीपुरवठा, कधी गॅस लाईन, कधी ठेकेदार – कारणे अनेक, पण उपाय नाहीत! नगर अभियंता, जल अभियंता, वॉर्ड ऑफिसर यांना सतत सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा खड्डा आता कोणाच्या मृत्यूची वाट पाहतोय का?

शहरातील नागरी सुविधांकडे प्रशासनाचे असेच दुर्लक्ष सुरू राहणार का? महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष न दिल्यास नागरिक तीव्र आंदोलन छेडण्यास मजबूर होतील.


ताराबाई पार्कमध्ये ‘मृत्यूचा खड्डा’ – 
Total Views: 34