बातम्या

मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

Demand for Z Plus security to Manoj Jarang


By nisha patil - 2/7/2024 7:41:06 PM
Share This News:



मनोज जरांगे  यांचा मुक्काम सध्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील आकाशात ड्रोन फिरताना दिसून आला आहे. सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन मनोज जरांगे राहत असलेल्या घराभोवती घिरट्या घालत होता. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन हा ड्रोन पाहिला होता. आंतरवालीच्या गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असली तरी मराठा आंदोलक हे काहीसे धास्तावले आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी जरांगे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. यासाठी पांडुरंग तारख हे आज जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.


मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी