बातम्या

स्वस्त धान्य पुरवठ्यात वाढीची मागणी...

Demand for increased supply of cheap food grains


By nisha patil - 1/17/2025 2:50:30 PM
Share This News:



स्वस्त धान्य पुरवठ्यात वाढीची मागणी...

आमदार राहुल आवाडे यांची तातडीने कार्यवाहीची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, अंतोदय आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत स्वस्त अन्नधान्याचा इष्टांक वाढवून मिळावा, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिव जयश्री भोसले यांच्याकडे केली.

सद्यस्थितीत उपलब्ध धान्य पुरवठा अपुरा असल्याने अनेक पात्र कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत. या मागणीवर सचिव भोसले यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी 15,000 आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक लाख इतका इष्टांक वाढवून मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


स्वस्त धान्य पुरवठ्यात वाढीची मागणी...
Total Views: 44