ग्रामीण
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी...
By nisha patil - 1/22/2025 5:30:20 PM
Share This News:
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी...
प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची शिवसेना जिल्हाप्रमुखांची मागणी..
कोल्हापूर जिल्ह्यात मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या वाढत असल्याने स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने शिवसेना उपनेते संजय पवार व सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर केले. यात संबंधित आरोग्य यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला असून, स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न जिल्ह्यात गंभीर होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात मुलींची संख्या झपाट्याने घटत असून ही बाब लिंग गुणोत्तरासाठी धोकादायक आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने सक्रिय पावले उचलावीत, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.जिल्हा प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन कठोर अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी...
|