बातम्या
कोल्हापूर शहरातील बंद दिवे सुरू करण्याची मागणी...
By nisha patil - 12/12/2024 11:09:44 PM
Share This News:
कोल्हापूर शहरातील बंद दिवे सुरू करण्याची मागणी...
भाजपाचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
भाजप कोल्हापूरच्या वतीने शहरातील बंद अवस्थेत असलेल्या २,५०० विजेच्या दिव्यांबाबत तक्रार दाखल करत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन दिले. विजेच्या दिव्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींसोबतच अपघात आणि चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. जन्म-मृत्यू दाखल्यांच्या विलंबाबाबत आणि महानगरपालिकेतील रेकॉर्ड व्यवस्थापनावर देखील त्यांनी टीका केली. भाजपाने यासंदर्भात तत्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कार्यक्रमाला भाजपाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापूर शहरातील बंद दिवे सुरू करण्याची मागणी...
|