बातम्या
ढगाळ वातावरण असूनही उष्णतेचा तडाखा; कोल्हापूरकर हैराण
By nisha patil - 10/4/2025 2:49:06 PM
Share This News:
ढगाळ वातावरण असूनही उष्णतेचा तडाखा; कोल्हापूरकर हैराण
तापमानाने गाठला 40 अंशांचा टप्पा; उकाडा वाढला
गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरात आकाश ढगाळ असले तरी उष्णतेचा जोर काही कमी झालेला नाही. दिवसभर असलेल्या उष्णतेमुळे नागरिकांची अक्षरशः दमछाक होत आहे. उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की लोकांच्या अंगाचा घाम गळ्यापासून पायापर्यंत वाहू लागलाय.
सध्या जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, किमान तापमानदेखील 24 अंशांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे रात्रीही उकाडा जाणवू लागलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे, मात्र तरीही तापमानात वाढ होण्याचा कल कायम राहणार आहे. सोमवारनंतर तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.
ढगाळ वातावरण असूनही उष्णतेचा तडाखा; कोल्हापूरकर हैराण
|