बातम्या
महाराष्ट्र डिजिटल मीडिया संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी निर्धार
By Administrator - 2/17/2025 4:15:22 PM
Share This News:
महाराष्ट्र डिजिटल मीडिया संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी निर्धार
इचलकरंजी | प्रतिनिधी महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन ६ एप्रिल रोजी सावंतवाडीत करण्यात आले असून, हे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार हातकणंगले येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.
.%5B9%5D.jpg)
संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी सांगितले की, ज्येष्ठ संपादक आणि माध्यमतज्ज्ञ राजा माने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार लवकरच डिजिटल मीडिया धोरण जाहीर करेल आणि डिजिटल माध्यमाला शासनमान्यता मिळण्याची शक्यता आहे.
या बैठकीत हातकणंगले तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी कीर्तिराज जाधव, उपाध्यक्षपदी राजू म्हेत्रे, सचिवपदी संभाजी चौगुले, संपर्कप्रमुखपदी विनोद शिंगे आणि खजिनदारपदी उत्तम हुजरे यांची निवड झाली. जिल्हा संघटक म्हणून अनिल उपाध्ये आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून सागर बाणदार यांची नियुक्ती करण्यात आली.
संघटनेच्या विस्तारासंदर्भात जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी माहिती दिली आणि डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटनेचे सभासद होऊन ६ एप्रिलच्या अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
बैठकीस इचलकरंजी शहर अध्यक्ष सलीम संजापुरे, विजय तोडकर, रामनाथ डेंगळे, राहुल पाटील, रणधीर नवनाळे, बबन शिंदे, शहाहुसेन मुल्ला, निहाल ढालाईत यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव यांनी केले, तर उपाध्यक्ष राजू म्हेत्रे यांनी आभार मानले.
महाराष्ट्र डिजिटल मीडिया संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी निर्धार
|