ताज्या बातम्या
ससेगाव येथे "देवाभाऊ केसरी" कुस्ती स्पर्धेचा थरार...
By nisha patil - 11/2/2025 3:18:10 PM
Share This News:
ससेगाव येथे "देवाभाऊ केसरी" कुस्ती स्पर्धेचा थरार...
आ. प्रविण दरेकर व आम.कोरे यांच्या उपस्थितीत भव्य आयोजन!
शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथे आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाच्या "देवाभाऊ केसरी" कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या कुस्ती मैदानाला कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी आमदार प्रविण दरेकर व आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून आबासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे (आप्पा), शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील (आण्णा), विष्णू पाटील, भारतीय जनता पक्षाच्या महिला आयोग प्रदेश सचिव डॉ. स्वाती दीपक पाटील, शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत, तसेच ससेगावचे माजी सरपंच संजय पारळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या भव्य कुस्ती मैदानात अनेक नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला, तर कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्तीचा आनंद लुटला. या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यात पुन्हा एकदा कुस्तीला मोठा उत्साह मिळाल्याचे पाहायला मिळाले.
ससेगाव येथे "देवाभाऊ केसरी" कुस्ती स्पर्धेचा थरार...
|