बातम्या
देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला लागलेली कीड, उपोषण सोडण्याच्या घोषणेवेळी मनोज जरांगेंची जहरी टीका
By nisha patil - 7/24/2024 12:25:56 PM
Share This News:
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणास बसले होते. आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला .मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं.
मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यासाठी आणि सलाईन लावण्यासाठी गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी आग्रह धरला. त्यानंतर आज मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती समोर येते. मनोज जरांगे यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा, सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणीस हे भाजपला लागलेली कीड आहे, अशी टीकाही जरांगे यांनी केली. माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणं हा सर्व देवेंद्र फडणवीसांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून मला मारण्याचा प्रयत्न आहे. बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं? तसेच अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती? मी काय दहशतवादी आहे काय असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला लागलेली कीड, उपोषण सोडण्याच्या घोषणेवेळी मनोज जरांगेंची जहरी टीका
|