बातम्या
धर्म दंड आपुल्या हाती चिंतनातून नवी जागृती..!
By nisha patil - 2/10/2024 4:37:05 PM
Share This News:
कणेरी मठ, कोल्हापूर येथे सिद्धगिरी मठातील धर्मध्वज स्तंभाचे उद्घाटन व संत समावेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते व माजी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठाचे संचालक श्री अदृष्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज, महंत रामगिरी महाराज, परमपूज्य योगी निरंजननाथ महाराज, देवव्रत महाराज वासकर, गहिनीनाथ महाराज औसेकर, माणिक महाराज मोरे, जीवन विद्या मिशनचे प्रल्हाददादा पै, धर्मवीर अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले तसेच राज्यभरातून आलेले साधू-संत आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्म दंड आपुल्या हाती चिंतनातून नवी जागृती..!
|