बातम्या
दिलजीत दोसांझने घेतली पीएम मोदींची भेट ; दिलजीतच्या पाठीवर कौतुकाची थाप
By nisha patil - 2/1/2025 9:48:32 PM
Share This News:
अभिनेता गायक दिलजीत दोसांझने लुमिनाटी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतली असून पंतप्रधान मोदींनी दिलजीतशी संवाद साधत दिलजीतच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील दिलीय.
दिलजीत दोसांझ पंजाब आणि हिंदी चित्रपट उद्योगातील एक सुपरस्टार तसेच प्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो. त्याने देशातील विविध राज्यांमध्ये त्याचे संगीत दौरे केले आहेत. तर गायक दिलजीत दोसांझने लुमिनाटी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतलीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायक दिलजीत दोसांझचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच पंतप्रधान मोदींनी दिलजीतच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील देलीय. पंतप्रधान मोदींनी गायक दिलजीत दोसांझचे संभाषण अतिशय स्मरणीय असल्याचे देखील सांगितले.
दिलजीत दोसांझने घेतली पीएम मोदींची भेट ; दिलजीतच्या पाठीवर कौतुकाची थाप
|