बातम्या

प्रगतशील शेतकरी दिनकर महादेव पाटील यांनी 47 पेरा ऊस नाथांच्या दरबारात उभा करून पहिला मान पटकवला

Dinkar Mahadev Patil a progressive farmer


By nisha patil - 10/24/2024 10:32:51 PM
Share This News:



कोल्हापूर, कागल तालुक्यातील म्हाकवे गावातील प्रगतशील शेतकरी दिनकर महादेव पाटील यांनी यावर्षी श्री क्षेत्र आप्पाची वाडी - कुर्ली येथे होणाऱ्या भोंब पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांतून सर्वाधिक उंचीचा ऊस उभा करून पहिला मान मिळवला आहे.

दिनकर महादेव पाटील यांनी आपल्या शेतात SNK 9293 या उसाच्या जातीचे उत्पादन घेतले असून, त्यांनी उभा केलेला 47 पेरा असणारा ऊस सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या ऐतिहासिक यशामुळे पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रत्येक वर्षी श्री नाथांच्या दरबारात ऊस उभा करण्याची परंपरा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी जोपासली आहे. यंदा पाटील यांनी प्रथम मान पटकवल्याने म्हाकवे गावाचे नावही अभिमानाने घेतले जात आहे.

दिनकर पाटील यांची मेहनत, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि ऊस लागवडीत केलेले नव्या पद्धतीचे प्रयोग यामुळे त्यांना हे यश मिळवता आले आहे.


प्रगतशील शेतकरी दिनकर महादेव पाटील यांनी 47 पेरा ऊस नाथांच्या दरबारात उभा करून पहिला मान पटकवला